पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!! शिवसेनेच्या “या” माजी आमदाराने चक्क शासकीय विश्रामगृहात केला महिलेवर अत्याचार

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना!!!! शिवसेनेच्या “या” माजी आमदाराने चक्क शासकीय विश्रामगृहात केला महिलेवर अत्याचार

पुणे

पुण्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात महिलेवर बलात्कार करणाऱ्या शिवसेनेच्या माजी आमदारावर विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्तम खंदारे असे माजी शिवसेनेच्या आमदाराचे नाव आहेत. ३७ वर्षे पीडित महिलेवर आमदार खंदारे यांनी पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या आयबी रेस्ट हाऊस या शासकीय निवासस्थात बळजबरीने बलात्कार केल्याप्रकरणी बिबेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मनाविरुद्ध बळजबरीने चाकूचा धाक दाखवत नैसर्गिक आणि अनैसर्गिक बलात्कार केल्याप्रकरणी खंदारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तम खंदारे हे मूळचे सोलापूरचे असून १९९५ मध्ये ते राज्यमंत्री होते. खंदारे हे भाजप-सेनेच्या युती सरकारमध्ये माजी सामाजिक न्याय आणि क्रीडा मंत्री होते.

पुण्यातील शासकीय विश्रामगृहात अत्याचार केल्याची तक्रार महिलेने दिली असून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खंदारे यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *