पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना !     “या” गावातील नदीत आढळला तीस वर्षीय युवकाचा पाच तुकडे केलेला आणि शिर नसलेला मृतदेह

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना ! “या” गावातील नदीत आढळला तीस वर्षीय युवकाचा पाच तुकडे केलेला आणि शिर नसलेला मृतदेह

पुणे

जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील भीमा नदीत सात मृतदेह आढळल्याने खळबळ माजली होती. यानंतर पोलिस तपासात एका मोठ्या हत्याकांडाचा उलघडा झाल्याने संपुर्ण महाराष्ट्र हादरला होता.ही घटना ताजी असतानाच इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी येथे आज भीमा नदी पात्रात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भीमा नदीत पाच तुकडे केलेला मृतदेह आढल्याने खळबळ माजली आहे.

या ३० वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने अतिशय क्रूरपणे खून करुन त्याचे पाच तुकडे करत शीर विरहित मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत टाकण्यात आला आहे.ही घटना समजताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, या मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसून या गुढ रहस्यमय क्रुर खूनाचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे,पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर, भिगवणचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांसह पोलिस पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *