मावळ
मावळमधील सुदुंबरे गावात बापानेच केला मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. बापाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
समीर बोरकर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.मावळमध्ये बाळू बबन बोरकर व त्याचा मुलगा समीर वास्तव्यास होते. मुलगा समीर हा रोज दारू पिवून येत होता. दारूच्या नशेत त्याचे व वडीलांमध्ये नेहमी भांडण होत असे. यात वडील हे नेहमी त्रागा करत असत, व मुलांवर बापाचा राग होता.
या रागाच्या भरात बापाने मुलाचा खून केला.भांडणाचा शेवट झाला पाहिजे असे वारंवार बाप बोलून दाखवत होता. शेवटी बापाने कुऱ्हाडीचे घाव घालून मुलाचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहे.