पुणे
पुण्यातून एक धक्कायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या प्रकरणी पोलिसांनी प्रियकरावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांनी प्रियकरावर प्रेयसीला (19 वय) आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
प्रेयसीच्या वडिलांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकर आणि प्रेयसी हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत. या दोघांचे प्रेमसंबंध होते.
प्रियकर हा विवाहाचे आमिष दाखवून प्रेयसीला घेऊन गावातून पसार झाला होता. त्यानंतर प्रेयसीने त्याच्याकडे विवाहाबाबत विचारणा केली. मात्र, त्यावेळी प्रियकराने लग्नास नकार दिला.
‘मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तुला जे करायचे ते कर, असं प्रियकर तिला म्हणाला.प्रियकराच्या बोलण्याचा मानसिक त्रास झाल्याने त्याच्या प्रेयसीने हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे हे करत आहेत