पुणे जिल्ह्यातील आणखी एक संतापजनक घटना !!!!! “या” जिल्हा परिषद शाळेतील वर्ग शिक्षकानंच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

पुणे जिल्ह्यातील आणखी एक संतापजनक घटना !!!!! “या” जिल्हा परिषद शाळेतील वर्ग शिक्षकानंच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

पुणे

वर्ग शिक्षकानेच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंचर पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबाजी उमाजी घोडे असे विनयभंग केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. या आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. आज (30 ऑगस्ट) पहाटे पाच वाजता पारगाव पोलीस स्टेशनमध्ये लाखनगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बाबाजी उमाजी घोडे पारगावचे केंद्रप्रमुख फिर्यादी कांताराम गोंडवे यांनी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार 354 त्याचप्रमाणे पोक्सो कलम 8 आणि 12 अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, भिगवण येथे देखील अशाच प्रकारची घटना घडली होती.

त्यानंतर तेथील प्रशासनाने काही उपाययोजना केल्या.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा प्रकार घडला. आपल्यासोबत संबंधित शिक्षक गैरप्रकार करत असल्याचे मुलीने आपल्या पालकांना सांगितले. त्यानंतर सर्वत्र ही घटना पसरल्यानंतर मुलीचे पालक आणि ग्रामस्थ मुख्याध्यापकांना भेटले.

त्यानंतर मुख्याध्यापकांनी ही माहिती केंद्रप्रमुख तसेच गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली.या संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. यामध्ये संबंधित मुलीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आले. त्यानंतर या घटनेसंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पुणे ग्रामीणचे एसपी अभिनव देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खाटे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *