पुणे
दौंड तालुक्यातील खोरवडी येथील ही घटना असून या घटनेत जावयाने धाकट्या मेव्हणीला पळवून नेल्याची फिर्याद सासऱ्याने दिल्याने पोलिसांनी जावई किरण नवनाथ चव्हाण याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात खोरवडी येथील सासऱ्याने फिर्याद दिली असून ५ मार्च २०२३ रोजी ही घटना घडली.
फिर्यादीची लहान मुलगी घरात दिसत नसल्याने फिर्यादीच्या पत्नीने फिर्यादीस बोलावून घेतले व मुलगी दिसत नसल्याची माहिती दिल्यानंतर मुलीचा शोध दौंड व खोरवडी परिसरात घेतला. मात्र मुलगी आढळून आली नाही.दरम्यान त्याचवेळी कारखेल (ता. बारामती) येथील किरण नवनाथ चव्हाण हा जावई देखील घरी नसल्याची माहिती मिळाल्याने सासऱ्याचा जावयावर संशय बळावला.
त्यामुळे सासऱ्याने आईसह कारखेल येथे जाऊन माहिती घेतली असता मोठी मुलगी घरी आहे, मात्र जावई घरी नसल्याने जावयानेच मुलीला पळवून नेल्याचा संशय सासऱ्याला आला.त्यावरून सासऱ्याने बारामती तालुक्यातील जावयाच्या विरोधात फिर्याद दिली. त्यावरून दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत.