पुणे जिल्हा हादरला!!!!                           महिला दिनाच्या दिवशीच जिल्ह्यातील “या” तालुक्यात दोन महिलांनी केली आत्महत्या

पुणे जिल्हा हादरला!!!! महिला दिनाच्या दिवशीच जिल्ह्यातील “या” तालुक्यात दोन महिलांनी केली आत्महत्या

पुणे

पूर्ण जगभरात महिला दिन उत्साहात साजरा करत असताना पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यात मात्र धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील दोन गावात दोन ठिकाणी दोन महिलांनी आपले जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दौंड तालुक्यातील पारगाव व कासूर्डी येथे दोन महिलांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.

तालुक्यातील पारगाव सालू मालु येथील यमुना हनुमंत कारंडे या महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. तर दुसऱ्या घटनेत कासुर्डी येथील पुनम बाळासो टेकवडे या महिलेने राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान दोन्ही महिलांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

सदर घटनेचा पुढील तपास यवत पोलीस करत आहेत. अशी माहिती पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *