पुणे
पुण्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात काल एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.भीमा नदीत पात्रात सात जणांचे मृतदेह आढळले होते. घटनेनंतर या सर्वांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र या सर्वांची आत्महत्या नसून हत्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहेयवतमधील सात जणांची आत्महत्या नसून हत्या असल्याचं पोलिसांना स्पष्ट केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३०२ चा गुन्हा दाखल केला आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाली आहे. चार जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.मोहन पवार यांच्या चुलत भावानेच हे हत्याकाडं केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर एक जण फरार आहे.
पूर्व वैमनस्यातून चुलत भावाने हत्या केली आहे. सहा महिन्यापूर्वी या आरोपी चुलत भावांपैकी एकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र हा अपघाती मृत्यू नसून मोहन पवार यांनी खून केल्याचा संशय या चौघांना होता त्यामुळे ही हत्या झाल्याचंही पोलीस तपासात उघड झालं आहे.
मोहन उत्तम पवार, संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. कुटुंबातील चार वर्षाच्या आतील तीन लहान मुलांचाही यात समावेश आहे.