पुणे
भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून अवघ्या १२ तासात हत्या करण्यात आल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. वाघ यांचा वाघ यांचा मृतदेह उरुळी कांचन मधील शिंदवणे घाटात सापडला आहे.अपहरण झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच त्यांची हत्या करण्यात आली असावी, अशी माहिती पोलिसांनी दिलीविधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह उरुळी कांचन मधील शिंदवणे घाटात सापडला.
पुणे शहर पोलिसांची फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाली आहे. घटनास्थळी पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस तपास करीत आहे. घटनास्थळी वाघ यांचे नातेवाईक सुद्धा पोहोचले आहे. पोलिसांकडून पंचनामा आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. यावेळी पोलीस आयुक्त ए राजा यांनी माहिती दिली.
सकाळी जेव्हा सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं. त्याची आम्हाला माहिती मिळाली. आम्ही सगळीकडे तपास केला. त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांचा मृत्यू हा सकाळी झाला असावा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.तसंच, “घटनास्थळावर एक लाकडी दांडा दिसत आहे. संध्याकाळी ५ ते ६ वाजता काही मुलं फिरण्यासाठी आले होते.
त्यांना सतीश वाघ यांचा मृतदेह दिसला. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर लगेच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यांच्या शरिरावर अजून कोणत्या जखमी आढळून आल्या नाही. त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर संपूर्ण माहिती समोर येईल, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त ए राजा यांनी दिली.