पुणे
पिसे (ता.पुरंदर )येथील हरिभक्त पारायण शंखनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सभा मंडपाचे विजय कोलते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
पिसे गावातील हरिभक्त पारायण यास्वरुपातून शंखनाथ महाराज यांचे गावासाठी खूप मोठे योगदान आहे.अशी व्यक्ती गावासाठी काय करू शकते हे पिसे येथील शेतकरी ग्रामस्थ ,सरपंच,माजी सरपंच ,वि.का.सो.चे चेअरमन,सदस्य ,युवक वर्ग ,महिला,यांनी खूप जवळून गावासाठी चे योगदान व मार्गदर्शन पाहिले आहे.असे प्रतिपादन विजय कोलते प्रवक्ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी व्यक्त केले.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या फंडातून पाच लाख रुपये महाराजांच्या सभा मंडपासाठी पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष माणिक झेंडे यांच्या माध्यमातून या सभा मंडपासाठी माजी सरपंच दीपक मुळीक ,सरपंच रोहन मुळीक ,उद्योगपती संतोष मुळीक ,पत्रकार बापू मुळीक ,दिलीप मुळीक यांनी पाठपुरावा केल्यामुळे सभा मंडपासाठी पाच लाख रुपये हा निधी मिळविण्यात यश आले.
यावेळी विजयदादा कोलते ,गणेश कोलते,चेअरमन वि.का.सो.,अप्पासाहेब कोलते,जगन्नाथ झेंडे सदस्य वि.का.सो.पिसर्वे,सरपंच रोहन मुळीक ,उद्योगपती संतोष मुळीक ,माजी सरपंच गणेश मुळीक ,सरपंच रमेश पिसाळ ,माजी मुख्याद्यापक बाळासाहेब मुळीक ,सरपंच बाळासाहेब कड ,माजी सरपंच दीपक मुळीक ,माजी उपसरपंच सोमनाथ मुळीक,रवींद्र मुळीक ,दिलीप मुळीक,संतोष मुळीक,ज्ञानदेव शेंडकर,जालिंदर मुळीक,प्रेमचंद कुटे ,बशीर सय्यद ,पुजारी विठ्ठल गिरीगोसावी,शिपाई विजय इंगळे,संतोष मुळीक तंटामुक्ती अध्यक्ष,माजी उपसरपंच शांताराम मुळीक ,नवनाथ मुळीक,वि.का,सो.सदस्य आप्पासो मुळीक,माजी चेअरमन वि,का.सो,रामदास उद्योजक गावातील शेतकरी ग्रामस्थ महिला युवक वर्ग ,ग्रामपंचायतीचे सदस्य ,शिपाई बहुसंख्येने उपस्थित होते.