पुरंदर
शेंडकर पिंपरी विविध कार्यकारी सेवा सहकार सोसायटी लि.शेंडकर पिंपरी ता.पुरंदर या संस्थेची सन २०२२ ते २०२५ पंचवार्षिक निवडणुक नुकतीच झाली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस चे कृषिभुषण महादेव शेंडकर व कॉंग्रेस पक्षाचे विजय थेऊरकर यांनी एकत्रित येऊन परिवर्तन पॕनलची स्थापना करून १२ उमेदवार उभे केले होते.
भैरवनाथ पॕनलमध्ये शिव सेना,राष्ट्रवादी काॕग्रेस चा शिवाजीबापु शेंडकर यांचा गट व माजी मंत्री दादा जाधवराव यांचा गट (सध्या बिजेपी पक्ष)व काॕग्रेस चे काही बंडखोर उमेदवार यांना एकत्र करून भैरवनाथ पॕनल ऊभा करून १२ उमेदवार उभे केले होते.परंतु महिला राखीव प्रतिनिधी मधील उमेदवार श्रीमती सुमन छाजेड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे अंतीम लढतीत ११ उमेदवार निवडणुक लढले.
ही निवडणुक आता तटीची झाल्याने संपुर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले होते. यामध्ये परिवर्तन पॕनलचे १२ पैकी १२ उमेदवार निवडुन येऊन भैरवनाथ पॕनलचे १२-० करुन धुव्वा उडविला.
ग्रामपंचायत निवडणुक तील हिशोबाची परतफोड
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कृषिभुषण महादेव शेंडकर व कॉंग्रेस चे विजय थेऊरकर वेगळे लढल्यामुळे मत विभागनी होवुन त्यांचा थेट लाभ भैरवनाथ पॕनला होवुन त्याची ग्रामपंचायत वरती एकहाती सत्ता आली होती यावेळी दोघेही एकत्र येऊन परिवर्तन पॕनल उभा करून १२- ० करून ग्रामपंचायत निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला.
परिवर्तन पॕनलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे कृषिभुषण महादेव शेंडकर ३२८ मते,विजयराव थेऊरकर ३१२,प्रविण मारणे ३०९ मते,विठ्ठल शेंडकर ३०८ मते,संतोष गायकवाड ३०७ मते,बाबुराव शेंडकर ३०३ मते,सुखदेव हंबीर २८५ मते,संपतदादा शेंडकर २८४ मते,अशोक सोनवणे २८२ मते,महादेव मोघे ३२३ मते,शितल चव्हाण ३३२ मते,शोभा हंबीर ३१७ मते असे सर्व १२ उमेदवार विजयी होवुन १२-० करून भैरवनाथ पॕनलचा धुव्वा उडविला. सोसायटी चे सध्याचे काळजी वाव्हु चेअरमन शिव सेनेचे श्री प्रकाश मारणे यांचे बंधु विजय मारणे यांनी अपक्ष उमेदवारी लढवुन त्यांना आवघे 1 मत मिळाले.
परिवर्तन पॕनलच्या वतीने कृषिभुषण महादेव शेंडकर विजयराव थेऊरकर हरिश्चंद्र थेऊरकर संपतदादा शेंडकर मा.सरपंच मिनाताई शेंडकर मा.सरपंच उत्तम हंबीर दत्तात्रय हंबीर रोहिदास हंबीर शिवाजी शेंडकर’ आंकुश शेंडकर दिलीप हंबीर शंकर शेंडकर युवराज शेंडकर अशोक शेंडकर माजी सैनिक हरिश्चंद्र शेंडकर दत्तात्रय चव्हाण संतोष थेऊरकर ईत्यादी सहकार्यानी परिवर्तन पॕनलचे कामकाज पाहिले.
आमदार संजयजी जगतात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॕकेचे विद्यमान चेअरमन डाॕ.दिंगबर दुर्गाडेसर माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरूंगे काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदिपआण्णा पोमण महाराष्ट्र प्रदेश काॕग्रेस कमिटी महा सचिव गणेश जगताप बारामती लोकसभा मतदार संघ अध्यक्ष अजिंक्यभैया टेकवडे समिती सदस्य सुनिताकाकी कोलते राष्ट्रवादी काॕग्रेस चे जिल्हा उप अध्यक्ष प्रकाश कड आदीनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.