पुरंदर/प्रतिनिधी अक्षय कोलते
पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे येथील महिलांना बडोदा बेरोजगार विकास संस्थान ( बडौदा- आरसेटी थेऊर , पुणे ) व पंचायत समिती , पुरंदर यांच्या वतीने १० दिवसीय कुकुटपालन व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण गावपातळीवर देण्यात आले . या उपक्रमात ३५ महिलांनी सहभाग घेवून कोंबडी पालन का करावे?कोणी करावे?कोबड्याचे आजार, उपचार व संगोपन तसेच कोंबड्यांच्या जाती, घरगुती पातळीवरील कोंबड्याचे खाद्य बनवण्याची पद्धत, लसीकरण व विक्री कौशल्य आदी शिकवण्यात आले.
यावेळी प्रशिक्षक डॉ . चंद्रकांत आपसिंग सरांनी कुकुटपालन विषयी योग्य माहिती सांगितली. कुक्कुटपालनासाठी बचत गटांच्या योजना व वैयक्तिक लाभांच्या योजना त्याच बरोबर बँकेच्या सर्व योजनांची माहिती देण्यात आली . घराजवळ पारंपारिक पद्धतीने खुराड्यातील कोंबडीपालन करताना व्यावसायिक दृष्टिकोन व आधुनिकतेची जोड दिल्यास ग्रामीण भागातील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होणार असल्याचे संस्थेचे संचालक श्री . दिनेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती तालुका अभियान व्यवस्थापक नंदा मॅडम तालुका व्यवस्थापक गणेश किकले सर तालुका समन्वयक श्री सागर ठाकणे,श्री रमेश भंडलकर,श्री मंगेश माने बडोदा आरसेटी प्रशिक्षक श्री विवेक जाधव,सी आर पी रेश्मा चव्हाण व गावातील प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.