सोलापुर
धनश्री ग्रुप ऑफ एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट पुणे महिला सक्षमीकरण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या पश्चिम महाराष्ट्र प्रमुखपदी सामाजिक कार्यकर्त्या माननीय सौ वनिता शिंदे कोरटकर यांची निवड करण्यात आली
धनश्री एज्युकेशन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय जी.रणदिवे, अजित केळकर महा प्रकल्प संचालक धनश्री एज्युकेशन ग्रुप,सौ.शिलाताई डावरे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य तथा महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख महिला आघाडी,सौ.रेखा बागुल अध्यक्ष धनश्री महिला सक्षमीकरण समिती महाराष्ट्र राज्य,माधुरी ताई उदावंत प्रदेश कार्याध्यक्षा यांनी ऑनलाईन मीटिंग द्वारे घेतलेल्या इंटरव्यू मधून ही निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल बोलताना सौ.वनिता शिंदे कोरटकर म्हणाल्या की,धैर्यशील मोहिते पाटील व सौ.शितलदेवी मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शैक्षणिक व सामाजिक कार्याची वाटचाल सुरू झाली समाजकार्याचा वसा मला माझे वडील दत्तात्रय शिंदे यांचेकडून मिळाला व माझे पती बाळासाहेब कोरटकर यांची खंबीर साथ व पाठिंबा मिळाला.शिवरत्न शिक्षण संस्थेतून शैक्षणिक वाटचालीस सुरुवात झाली व शिवरत्न फाउंडेशन व डॉटर्स माॅम फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला.आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारावर खंबीरपणे मात करत त्यांनी मानव संरक्षण समिती सोलापूर जिल्हा विभाग, मराठा सेवा संघ अशा विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी आजवर विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत यामध्ये प्रामुख्याने अकलुज मधील कुपोषित बालकांना दत्तक घेऊन खाऊ वाटप,गरजू गरीब महिलांना शिलाई मशीन वाटप,सातारा जिल्ह्यातील अपशिंगे मिलिटरी येथील वीर पत्नी व वीर माता यांचा तिळगुळ समारंभ व सन्मान सोहळा,गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप,वृक्षारोपण,गोविंद वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप,कोविड पेशंटच्या नातेवाईकांना डबे पुरविणे, जिजाऊ मुलींचे वसतिगृह पंढरपूर येथे स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांचा संच भेट दिला,जागतिक महिला दिनानिमित्त तृतीयपंथी यांचा सन्मान सोहळा,भारतीय संविधान दिनानिमित्त कोविड योद्धांचा सन्मान सोहळा,महाड येथील पूरग्रस्तांना संसार उपयोगी साहित्य वाटप,ग्रामीण भागातील मुलींसाठी फॅशन शो कार्यशाळा,यासारखे अनेक सामाजिक उपक्रम त्या राबवीले आहेत तसेच त्यांना साहित्याची आवड असून शब्द श्री प्रकाशन पुणे याच्या त्या प्रकाशिका आहेत
धनश्री एज्युकेशन ग्रुप विषयी माहिती सांगताना म्हणाल्या धनश्री एज्युकेशन ग्रुप प्रामुख्याने महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्नशील असून या संस्थेची ध्येय धोरणे व उद्दिष्टे आवडल्यामुळे या संस्थेसोबत काम करण्यासाठी इच्छुक होते या संस्थेच्या माध्यमातून महिला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करण्यावर भर देण्यात येणार आहे यासाठी महिलांमध्ये असलेले आणि नसलेले स्किल डेव्हलप करून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण करत शिवणकला,ब्युटी पार्लर,पत्रकारिता,समाज सेवक, अंगणवाडी,बालवाडी,माॅंटेसरी,ई लर्निग इत्यादी प्रशिक्षण देऊन बेरोजगार हाताला कौशल्य विकसित करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे सक्षम महिला हाच कुटुंबाचा खरा आधार असतो म्हणून स्वाभिमानी, स्वयंपूर्ण,सामर्थ्यशाली नारीशक्तीची उभारणी हाच ध्यास असल्याचे सांगितले.
या निवडीबद्दल सौ.शितलदेवी मोहिते-पाटील ,उत्तमराव माने,सौ.अक्काताई माने,सौ.हेमलता मुळीक,प्रिया नागणे,राजेंद्र मिसाळ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.