पुरंदर
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक नुकतीच जाहिर झाली आहे. पुरंदर पंचायत समितीच्या पिसर्वे गणातुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने संधी दिली तर निवडणुक लढविणार असल्याचे पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे उपाध्यक्ष सुमित जगताप यांनी संजीवनी न्युजशी बोलताना सांगीतले.
सुमित जगताप हे आंबळे गावचे रहिवाशी असुन ते आंबळे ग्रामविकास प्रतिष्ठान व शिवराय वॉरियर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
एक तरुण चेहरा म्हणुन त्यांची पुरंदरच्या पुर्व भागात चांगलीच ख्याती आहे. पुरंदर तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे उपाध्यक्ष म्हणुनही ते राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाची भुमिका तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करत आहेत.
पिसर्वे गणात तरुणांचे उत्तम संघटन करुन प्रत्येक तरुणाच्या अडीअडचणीत मदत करण्याचे काम हे सुमित जगताप यांनी केले आहे.
येणार्या काळात पंचायत समितीच्या माध्यमातुन पिसर्वे गणाचा सर्वांगीण विकास करण्याचा माणस असल्याचे सुमित जगताप यांनी सांगीतले.
1no