पुरंदर
पुरंदर तालुक्यातील संपूर्ण व बारामती तालुक्यातील काही क्षेत्र कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून मतदार यादी निश्चित झाली आहे. दिनांक 28 एप्रिल ला मतदान होणार आहे.
सध्या या संस्थेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. 27 मार्चपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येतील.तर 3 एप्रिल ही शेवटची मुदत असेल. त्याच दिवशी दुपारी तीन नंतर नामनिर्देशन पत्राची यादी जाहीर करण्यात येईल.
पाच एप्रिल रोजी छाननी,सहा एप्रिलला नामनिर्देशन पत्राची यादी प्रसिद्ध होणार आहे.अर्ज मागे घेण्याची 20 एप्रिल शेवटची तारीख आहे.
21 तारखेला उमेदवारांना निशाणी वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून 29 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.