पुणे
दिल्ली निर्भया हत्याकांडांने संपूर्ण देश हादरला होता. त्या प्रकरणात संपूर्ण देशात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आता. त्यामुळे महिला अत्याचारांच्या वारंवार घटनेच्या विरोधात निर्भय फंड तयार करण्यात आला होता. तत्कालीन सरकारने २०१३ साली महिला सुरक्षेसाठी निर्भय फंडाची स्थापना केली होती. महिलांच्या सुरक्षेसाठी हा फंड आहे. मात्र, या निर्भया फंडाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी उपायोजना म्हणून हा फंड तयार करण्यात आला होता. महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या निर्भया फंड हा लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी खर्च करण्यात आल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. खासदार सुळे यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘निर्भया फंड हा केंद्र सरकारने मनमोहनसिंग यांनी तयारी केली होती. महिलांच्या सुरक्षेसाठीच हा फंड होता. या फंडातून महिलांच्या सुरक्षेसाठी आणण्यात आलेली वाहने लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी वापरणं हे चुकीचं आणि दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये व्हीआयपी कल्चर लागू होत आहे हे चुकीचं आहे’.लोकप्रतिनिधींची सुरक्षा ही महत्त्वाची आहे हे मी मान्य करते. पण त्याचबरोबर दुसऱ्याची सुरक्षा काढून घेणे हे अयोग्य आहे’, असेही सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या.