नात्याला काळीमा फासणारी घटना !!!!! जादुटोणा आणि काळ्या जादुच्या हेतुने आजीनेच केली आपल्या नातीची हत्या

नात्याला काळीमा फासणारी घटना !!!!! जादुटोणा आणि काळ्या जादुच्या हेतुने आजीनेच केली आपल्या नातीची हत्या

सातारा

साताऱ्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जादूटोणा आणि काळ्या जादूच्या हेतूनं आजीनेच नातीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. २०१९ च्या जानेवारी महिन्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक घटना पोलिसांनी उघड केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीच्या आजीसह तिघांना अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साताऱ्याीतल करपेवाडी गावाच्या हद्दीतील देसाई शेत नावाच्या ऊसाच्या शिवारात अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने भाग्यश्री संतोष माने या १७ वर्षीय मुलीचा गळा कापून हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यावरून मुलीची हत्या ही नरबळीकरिता करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.

सदर घटनेनंतर अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा व अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून सदरचा प्रकार हा नरबळीचा असल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना विवेक लावंड, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण विभाग पाटण व किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा व संतोष पवार सहायक पोलीस निरीक्षक ढेबेवाडी पोलीस ठाणे यांना दिल्या.

त्याप्रमाणे गुन्हा उघडकीस आणण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा सातारा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पाटण व ढेबेवाडी पोलीस ठाणेकडील पथके अथक प्रयत्न करत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *