नात्याला काळिमा फासणारी घटना!!!! “या” गावात जन्मदात्या बापाकडून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

नात्याला काळिमा फासणारी घटना!!!! “या” गावात जन्मदात्या बापाकडून तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार..

बीड

जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटनाघडली आहे. 36 वर्षीय जन्मदात्या नराधम बापानेच, आपल्या पोटच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

ही संतापजनक बीडच्या शिरूर कासार तालुक्यात घडली आहे.13 जूनच्या मध्यरात्री आठवीच्या वर्गात शिकत असलेली पीडित मुलगी, आपल्या घरासमोरील अंगणात बाजेवर झोपली होती. यावेळी आरोपी नराधम बापाने तिला खाली झोपायला सांगितले. त्यांनतर आपल्या वडिलांनी सांगितल्याने पीडिता खाली झोपली.

यावेळी मध्यरात्री 2 च्या दरम्यान बापाच्या नावाला कलंक असलेल्या नराधमाने, पोटच्या मुलीवर अत्याचार केला. यावेळी पीडितेने आरडाओरडा केल्यानंतर बाजूला झोपलेली तिची आई जागी झाली. मात्र तिला आरोपी नराधमाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने ती काहीच करू शकली नाही.

विशेष म्हणजे एवढ होऊनही पिडीतेच्या आईने तिला दोन दिवस पोलिसात तक्रार देऊ दिली नाही. मात्र पिडीतेच्या आज्जीने पीडितेला सोबत घेऊन शिरूर कासार पोलिस ठाणे गाठले. आणि पिडितेने आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली.

दरम्यान, पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी नराधम बापाविरुद्ध शिरूर कासार पोलीस ठाण्यात, बाललैंगिक अत्याचार , पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या घटनेने बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासला असून नराधम आरोपी बापाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या नराधम बापाला कठोरात कठोर शासन करावं अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *