दौंड
दिव्यांग बांधवांच्या थकित रकमा जमा न केल्याच्या निषेधार्थ दौंड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांची खूर्ची उलटी करून त्यास हार घालून निषेध करण्यात आला.
दिव्यांग बांधवांच्या मागण्यांची प्रशासन व पदाधिकारी दखल घेत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले.प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा सुरेखा ढवळे व पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दौंड नगरपालिकेने दिव्यांग बांधवांसाठी मागील वर्षी १६ लाख रूपयांची तर चालू वर्षी १३ लाख रूपयांची तरतूद केली आहे.मागील वर्षीच्या रकमेपैकी पाच लाख रूपये थकित आहेत.
त्यासंबंधी नगरपालिकेला वारंवार कळवून देखील रक्कम देण्यात आली नाही.रक्कम देण्यास टाळाटाळ होत असल्याने आज नगरपालिका कार्यालयाच्या दारात आंदोलन करण्यात आले. मात्र प्रशासनाने आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याने दिव्यांग बांधवांनी थेट नगराध्यक्षा शीतल कटारिया यांच्या दालनातील खूर्ची उलटी करून त्यास हार घालीत ठिय्या आंदोलन केले.