धक्कादायक!!!!!    “या” महिला आमदारांवर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला;स्वत: ट्विट करत दिली माहिती

धक्कादायक!!!!! “या” महिला आमदारांवर अज्ञात व्यक्तीने केला हल्ला;स्वत: ट्विट करत दिली माहिती

हिंगोली

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हिंगोलीत हल्ला झाल्याची माहिती आहे. आमदार प्रज्ञा सातव यांनी स्वतः ट्विट करत आपल्यावर हल्ला झाल्याची माहिती दिली आहे. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असं प्रज्ञा सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आज मी कळमनुरी तालुक्यातील कसबे दवंडा या गावाच्या दौऱ्यावर असताना, माझ्यावर एका अज्ञात व्यक्तीने मागून हल्ला केला. आज माझे पती राजीव भाऊ नाहीत आणि माझी मुले लहान आहेत. मी कुणाचेही वाईट केलेले नाही. महिला आमदारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे.

माझ्या जीवाला धोका असला तरी, मी माझ्या लोकांसाठी काम करत राहीन. कारण राजीव भाऊंचे आशिर्वाद माझ्या पाठीशी आहेत. इतिहासात सावित्रीबाई, इंदिराजी यांच्यासारख्या थोर महिलांवरही हल्ले झाले आहेत. मात्र, त्यांनी घरी न बसता आपले काम सुरु ठेवले. माझ्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता”, असं प्रज्ञा सातव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. तसेच त्या काँग्रेसच्या विधानपरिषदेतील आमदार देखील आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची राज्यसभेवर वर्णी लागेल अशी चर्चा रंगली होती.

मात्र, पक्षानं त्यांच्या जागी रजनी पाटील यांना राज्यसभेवर पाठवलं.दुसरीकडे प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर प्रज्ञा सातव यांची वर्णी लागली होती. विधान परिषद पोटनिवडणुकीत त्यांची निवड बिनविरोध झाली होती. महाविकास आघाडीने सातव यांना पाठिंबा दिला होता, भाजपा उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने सातव यांची बिनविरोध झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *