पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वाळुंज येथे एक धक्कादायक घटना घडली आहे.वाळूज ता. पुरंदर येथील युवक क-हा नदीच्या कडेला शेळ्या चारत होता यावेळी बाजूचे झुडूप तोडत असताना विजेचा धक्का लागल्याने यामध्ये सार्थक कैलास तावरे वय १७ याचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना घडली असून यासंदर्भात मृताचे वडील कैलास साधू तावरे वय ४६ रा.वाळुंज यांनी सासवड पोलीस स्टेशनला जबाब दिलेला आहे
या बाबत सासवड पोलिसांकडून, मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे त्यांचा मुलगा सार्थक याच्या सोबत शेळ्या चारण्यासाठी गावच्या शेजारील क-हा नदीच्या शेजारी शेळ्या चारत असताना वाघिरे महाविद्यालयामध्ये बारावीचे शिक्षण घेणारा त्यांचा मुलगा सार्थक हा शेळ्यांसाठी बाभळीचे झुडूप तोडत असताना जोरात ओरडल्याचा आवाज आला म्हणुन ते पळत तेथे गेले असता त्यांचा मुलगा सार्थक हा झुडुप तोडत होता.
त्याच्या वरती मुख्य विज वाहिनीच्या तारा गेलेल्या होत्या त्या वीजवाहक तारांचा विजेचा धक्का लागुन सार्थक हा जमीनीवर बेशुध्द अवस्थेत पडलेला होता. त्याचे पायाला भाजल्याची जखम झाली होती. व हाताला खरचटलेले होते.
मुलाला या अवस्थेत पाहुन फिर्यादी यांनी जोरात आरडा ओरडा केला.आजु बाजुचे गावातील लोक जमा झाले.
त्यांनी गावातील खाजगी डॉक्टरांना बोलावून घेतले. डॉक्टरांनी मुलगा सार्थक याला सासवड येथे घेऊन जाण्यास सांगितले. सार्थक याला सासवड येथील सरकारी दवाखाण्यात आणले असता सरकारी दवाखाण्यात डॉक्टरांनी सार्थक याचा त्याला विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला असावा असे सांगीतले आहे.