पुरंदर
पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे शेतजमिनीच्या कारणातून हातातील कडे,दगड,लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना घडली असून गणेश बबन लोळे वय ३८ वर्षे रा.पानवडी ता.पुरंदर जि.पुणे यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे .
यासंदर्भात सासवड पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार दि . २८/०५/२०२ रोजी फिर्यादी हे त्यांची पत्नी व मुलांसोबत पुणे येथून गावाकडे पानवडी येथे आले होते काल दि. २९/०५/२०२२ रोजी दुपारी ३ः३० वा. चे सुमारास फिर्यादी हे घरी असताना अशोक ज्योतीबा लोळे, व ज्योतीबा दिनकर लोळे दोघे त्यांच्या घरासमोर आले व शेतजमीनीचे कारणावरून फिर्यादी यांना शीवीगाळ करू लागले त्यावेळी फिर्यादी यांनी त्यांना शीवीगाळ का करता असे विचारले असता दोघांनी हाताने लाथाबुक्याने मारहाण केली.
त्यांचे हातातील कडयाने डोक्यावर, कपाळावर, मारहान करून दुखापत केली. व अशोक लोळे याने दगड उचलुन छातीवर मारून दुखापत केली.व दगडामध्ये ढकलुन दिले त्यावेळी फिर्यादी यांच्या उजवे पायाचे अंगठयाला दुखापत झाली.फिर्यादी यांच्या पत्नी सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना ढकलुन दिले.
तु आर्मी वाला असुदे नाहीतर कोणीही असुदे तुला जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी हे सासवड पोलीस स्टेशन येथे आले पोलीसांनी त्यांची एन.सी. नोद करून दवाखान्यात जाण्याची यादी दिली. आज दि. ३० मे २०२२ रोजी वैदयकीय प्रमाणपत्र घेवुन तक्रार देण्यास आले .
सदर मारहानीत फिर्यादी यांच्या डोकीस, कपाळावर, छातीवर, उजवे पायाचे अंगठयाला दुखापत झाली आहे. म्हणुन आरोपी १) अशोक ज्योतीबा लोळे, २) ज्योतीबा दिनकर लोळे दोघे रा.पानवडी ता.पुरंदर जि.पुणे यांचे विरूध्द भा.द.वि .क. ३२४,३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना.पोटे पुढील तपास करीत आहेत .