धक्कादायक!!!!!  पुण्यातील “या” गावात मित्रानेच मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकुन जिवंत जाळल

धक्कादायक!!!!! पुण्यातील “या” गावात मित्रानेच मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकुन जिवंत जाळल

पुणे

उसने पैसे परत न दिल्याने चिडुन आपल्याच मित्राच्या अंगावर पेट्रोल टाकुन पेटवुन दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील फुरसुंगीजवळ घडला आहे.उपचारादरम्याण तरुणाचा मृत्यु झाला असुन हडपसर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

संतोष दादाराव कागदे असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी मनोज मोहन कांदे यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संतोष व मनोज हे दोघे मित्र होते.संतोष याने मनोजकडुन उसने पैसे घेतले होते.तो पैसे परत देत नसल्याने त्यांच्यात वाद होत होते.पैसे परत देत नसल्याने मनोज चिडला होता. आज काहीतरी सोक्षमोक्ष लावायचा या इराद्याने त्याने संतोषला फुरसुंगीतील संकेत विहाराजवळ असलेल्या विहीरीपाशी बोलावले.तिथे आल्यावर संतोषला पैशाची विचारणा केली पण संतोष पैसे द्यायला टाळाटाळ करायला लागला.त्यानंतर तुला पेट्रोल टाकुनच पेटवुन देतो,असे म्हणत मनोजने बाटलीतुन आणलेले पेट्रोल संतोष याच्या अंगावर ओतले.व काडी लावुन त्याला पेटवुन दिले यात संतोष गंभीररित्या जळाला. त्याला उपचारासाठी ससुन रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु संतोष कायदे याचा मृत्यु झाला.

हडपसर पोलिसांनी मनोज कांदे यास अटक केली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक आढाळगे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *