धक्कादायक!!!!!!          पुणे जिल्ह्यातील “या” गावात सरपंचानेच केला तरुणावर जीवघेणा हल्ला;तरुण गंभीर जखमी

धक्कादायक!!!!!! पुणे जिल्ह्यातील “या” गावात सरपंचानेच केला तरुणावर जीवघेणा हल्ला;तरुण गंभीर जखमी

पुणे

मावळमधील अनेक धक्कादायक आणि गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. मावळातील वळवंती गावात सरपंचाने तरुणाला जीवघेणा हल्ला करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यामुळे मावळ भागामध्ये दादागिरी वाढली असल्याचे दिसून येत आहे.

रविवारी (दि.10) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात सरपंचासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये स्वप्निल तुकाराम शिंदे (वय 26) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीवरून गावाचे सरपंच रोहिदास जांभूळकर तसेच साथीदार तुषार जांभुळकर, अभिषेक जांभुळकर, दिलीप जांभुळकर, रामदास जांभुळकर,अमोल रगडे, प्रमेश जांभुळकर, बाळा शिंदे व बाळा जांभुळकर या 9 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत शुभम दत्तात्रय डेनकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व शुभम हे गावात मंदिरासमोर थांबले होते. मात्र यावेळी आरोपी व त्यांचे साथीदार हातात लोखंडी रॉड व काठी घेऊन तिथे आले त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी त्यांनी गार्डनच्या काचाही फोडल्या व जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी सरपंच रोहिदास जांभूळकर याने शुभमच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. यावरून कामशेत पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *