धक्कादायक !!!! कंत्राटदाराचे कामाचे बिल मंजुरीसाठी तब्बल पन्नास हजाराची लाच मागणारा “या” गावचा ग्रामसेवक अडकला जाळ्यात

धक्कादायक !!!! कंत्राटदाराचे कामाचे बिल मंजुरीसाठी तब्बल पन्नास हजाराची लाच मागणारा “या” गावचा ग्रामसेवक अडकला जाळ्यात

सोलापुर

१५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेषनिधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात पाठपुरावा करणाऱ्या ठेकेदाराकडून ५० हजाराची लाच मागणाऱ्या बोराळे (ता मंगळवेढा) येथील ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी(वय-५६ वर्षे) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडला आहे याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सदर प्रकरणातील तक्रारदार यांचे मित्र हे कॉन्ट्रक्टर असुन त्या मित्रानी बोराळे, ता. मंगळवेढा येथे शासकीय योजनेतील १५ व्या वित्त आयोगाच्या कामाचे जिल्हा परिषद शेष निधी अंतर्गत केलेल्या कामाच्या बीला संदर्भात तक्रारदार पाठपुरावा करीत होते. सदर कामाच्या बीलाची रक्कम खात्यात जमा केली बाबत ग्रामसेवक गोपीचंद गवळी यांनी तक्रारदार यांच्याकडे बक्षिस / मोबदला म्हणून १ लाख रुपयांची लाचेची मागणी करुन पहिला हप्ता ५० हजार रुपये मागणी केल्याचे पडताळणीत स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी यांच्यावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस हवालदार प्रमोद पकाले,उमेश पवार, स्वप्निल राणके, शाम सुरवसे यांच्या टीमने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *