अहमदनगर
श्रीगोंदा तालुक्यातील वडघुल-खांडगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.याप्रकरणी ग्रामसेवकांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरुन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांसह एका महिला सदस्याच्या मुलाविरोधात श्रीगोंदा पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
झुंबर मुरलीधर गवांदे असे ग्रामसेवकाचे नाव असुन
उपसरपंच रामदास घोडके आणि आनंदा शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
उपसरपंच रामदास घोडके आणि आनंदा शिंदे यांनी गावातील वनविभागाच्या जमीनिवर गावकर्यांनी केलेले अतिक्रमण कायदेशीर करत त्याची नोंद रजीस्टरला करण्यासाठी दबाव आणत होते.
तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या ग्रामसभेच्या दिवशी गवांदे यांना सर्वांसमोर झाडु मारायला लावला होता.तसेच वरिष्ठ कार्यालयात उपसरपंच घोडके व शिंदे हे वारंवार खोटे अर्ज करत असत या सर्व गोष्टींचा त्रास असह्य झाल्यामुळे गवांदे यांनी आत्महत्या केली.या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.