दुर्दैवी!!!                   वेगरे येथील गोपालक शेतकरी कोंडीबा मरगळे यांचा पुराचे पाण्याने वाहून मृत्यू

दुर्दैवी!!! वेगरे येथील गोपालक शेतकरी कोंडीबा मरगळे यांचा पुराचे पाण्याने वाहून मृत्यू

पुणे

पुणे जिल्ह्यातील वेगरे,निर्गुडवाडी (ता.मुळशी) येथील गोपालक शेतकरी कोंडीबा रामा मरगळे वय 70 वर्ष यांचा पुराचे पाण्याने वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. याबाबत सविस्तर घटना अशी की मरगळे हे आपल्या पत्नी समवेत वेगरे, निर्गुडवाडी तेथे राहत होते त्या ठिकाणी त्यांचे एकमेव कुटुंब राहत असून शेती व पशुपालन करत होते नेहमीप्रमाणे मरगळे गुरुवारी सकाळी 11 चे दरम्यान आपल्या गाई व जनावरे घेऊन मुठा नदी परिसरात चारण्यासाठी गेले होते.

संध्याकाळी जनावरे घरी आली परंतु मरगळे आलेच नाहीत म्हणून त्यांची पत्नी कोंडाबाई मरगळे यांनी शेजारीच्या वस्तीवर याबाबत माहिती दिली व परिसरात शोध घेतला असता अंधार व जोरदार पावसामुळे त्यांचा शोध लागला नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सदाशिव ढेबे, महादेव कोकरे, व त्यांचा मुलगा लक्ष्मण मरगळे यांनी स्थानिक ग्रामस्थ्यांसमवेत ते ज्या ठिकाणी जनावरे घेऊन गेले होते त्या परिसरात शोधले असता मुठा नदी पात्रालगतच त्यांचा मृतदेह आढळला.

सदरचा मृत्यू हा जोरदार पावसामुळे नदी व ओढ्याला जास्त पाणी आल्याने त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहून जाउन झाल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा अंदाज असून,सदर घटनेची माहिती समजताच वेगरे गावच्या पोलीस पाटील यमुना भाऊ मरगळे यांनी याबाबत पौड पोलीस स्टेशनला खबर दिली असून घटनेचा तपास करून शासनाच्या माध्यमातून मरगळे यांच्या पत्नीला मदत मिळावी व वेगरे ग्रामस्थांना मुठा नदीवरून येण्या-जाण्यासाठी अनेक वर्षांची प्रलंबित मागणी असलेल्या फुलासाठी निधी मंजूर व्हावा याबाबत शासनाकडे मागणी केली आहे.

सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ सदाशिव ढेबे, मल्लिक कोकरे, महादेव कोकरे, चंदू कोळी,सदाशिव गुजर, माजी सरपंच तानाजी मारणे व ग्रामस्थांनी मदत केली यावेळी घटनास्थळी पोलीस बीट अंमलदार सुरवसे व जगदाळे तसेच पोलीस पाटील यमुना भाऊ मरगळे हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *