कोल्हापूर
आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. महागाईचा आगडोंब सुरू असतानाच गोकुळ दूध संघाने दरवाढीचा दणका दिला आहे. गोकूळ दुध संघाने दुधाच्या विक्री दरात 2 रुपयांची वाढ केली आहे. उद्यापासून म्हणजेच रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
गोकुळकडून प्रतिलिटर दूध विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये 1 लिटर दुधासाठी 66 रुपये मोजावे लागतील. याशिवाय दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची तर गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, दुध दरवाढीचा हा निर्णय 27 जुलै रोजी घेण्यात आला होता. अशी माहिती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली.