“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” च्या जय घोषात नारायणपुरला दत्त जन्म सोहळा संपन्न

“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” च्या जय घोषात नारायणपुरला दत्त जन्म सोहळा संपन्न

पुणे

श्री क्षेत्र नारायणपुर ( ता. पुरंदर ) येथे फुले आणि विद्युत रोषणाईने सजवलेल्या दत्तमंदिरांमध्ये “दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ च्या गजर करून भाविकांनी नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली फटाक्यांच्या आतश बाजीत दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा झाला.

फुलांच्या आकर्षक रचना आणि सजवलेल्या मंदिरांमध्ये दिवसभर वैविध्यपूर्ण धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल अनुभवायला मिळाली.

येथे दत्त जयंती सोहळा ७ वाजुन ०३ मिनिटांनी मोठ्या उत्साहात पार पडला. या दत्त जयंती सोहळ्यासाठी अनेक राज्यातुन हजारो भाविकांनी हजेरी लावली आणि दत्त जन्मा वेळी वैभवकाका काळे यांचे आख्यान,नाव ठेवणे,पाळणा,पुष्पवृष्टी, देवभेटविणे,सुंठवडा वाटप आदी कार्यक्रम झाले.

यावेळी माजी खा.सुरेश वाघमारे,आमदार संजय जगताप,माजी आ.उल्हास पवार,माजी महापौर राहूल जाधव,शंकर जगताप,गिरीराज सावंत,विश्वहिंदु परिषदेचे प्रचारक दादा वेधक,जालींदर कामठे,प्रशांत पाटणे,बाळासाहेब सोळसकर,भरतनाना क्षीरसागर,रामभाऊ बोरकर,नितिन झेंडे,रामदास मेमाणे,तात्यासाहेब भिंताडे, बबन टकले,दत्तात्रय गवारी,धनंजय पाटील,आण्णासाहेब घोलप,सरपंच चंद्रकांत बोरकर, उपसरपंच धनश्री झेंडे,रामदास मेमाणे,श्रीनाथ बोरकर, एम. के. गायकवाड, मारुती बोरकर, आजित बोरकर आदी उपस्थित होते.मध्यप्रदेश,उत्तराखंड,कलकत्ता,कन्याकुमारी,राजस्थान येथील भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *