पुरंदर
पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ कृपा नागरी पतसंस्थेच्या कारभारातील गैर व्यवहारामुळे दिलीप यादव यांना पतसंस्थेच्या अध्यक्ष पदावर राहण्यास अपात्र ठरविण्यात आले असल्याचे वृत्त संजीवनी न्युजच्या हाती आले आहे.
पतसंस्थेतील थकबाकीदार यांनीच थकबाकी बुडवण्यासाठी माझ्यावर आरोप केले आहेत व हे राजकीय षडयंत्र आहे : दिलीप यादव, तालुकाप्रमुख, शिवसेना
पुरंदर तालुका शिवसेना अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य असलेले दिलीप यादव यांच्यासारख्या व्यक्तीमत्वावर अशा प्रकारचा आरोप होणे हे भुवया उंचावण्यासारखे आहे.