“तू तुझ्या पतीला घटस्फोट दे, घरातून हाकलून दे नाही तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेईन” ; तरुणाची एक्स गर्लफ्रेंडला धमकी,पुण्यात “या” ठिकाणी गुन्हा दाखल

“तू तुझ्या पतीला घटस्फोट दे, घरातून हाकलून दे नाही तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेईन” ; तरुणाची एक्स गर्लफ्रेंडला धमकी,पुण्यात “या” ठिकाणी गुन्हा दाखल

पुणे

पूर्वीच्या प्रेयसीला व तिच्या पतीला वारंवार कॉल करून, तसेच प्रेयसीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मांजरी येथील २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, पोलिसांनी अहमदनगर- नेवासा येथील २५ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. तरुणाने फिर्यादी तरुणीला ‘तू तुझ्या पतीला घटस्फोट दे, घरातून हाकलून दे नाही तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेईन’. या गोष्टीला तुम्ही दोघे जबाबदार असाल, असा मेसेज पाठवून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तरुण आणि तरुणी शिक्षणासाठी एकत्र होते. त्यावेळी हा तरुण त्या तरुणीच्या पाठिमागे लागल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आता या तरुणीचा विवाह झाला आहे, पण तरीही हा तरुण या तरुणीला फोन, मेसेज करुन त्रास देत धमकी द्यायचा अस या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *