औरंगाबाद
औरंगाबाद जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून मुलींना, युवतींना, महिलांना तसेच विवाहित महिलांना त्रास देण्याचे प्रकार वाढल्याचे सातत्याने पोलिसांत होत असलेल्या नोंदीवरुन स्पष्ट होत आहे. समाज माध्यमातून बदनामी करु असे सांगून युवक, पुरुष युवतींना त्रास देताहेत.
आपली बदनामी होऊ नये यासाठी काही वेळेला युवती, महिला पोलिसात धाव घेत नाहीत परंतु प्रकरण वाढल्यानंतर अथवा त्यांना खूप त्रास झाल्यास त्या पोलिसात जात असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे.पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
एका घटनेत मला आय लव्ह यू म्हण नाहीतर तुझ्या फोटोचे गल्लीत बॅनर लावेल व्हायरल करेल अशी धमकी महिलेला देणाऱ्या एका तरुणावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.सचिन दाभाडे असे संशियताचे नाव आहे. सचिनने तक्रारदार महिला परिचित आहेत. त्याने महिलेशी जवळीक निर्माण केली.
त्यानंतर वारंवार संपर्क साधून आय लव्ह यू म्हणाली नाहीस तर तुझे फोटो गल्लीतील मुलांच्या ग्रुपवर व्हायर करेल अशी धमकी दिली.याचबरोबर तुझ्या नवऱ्या विषयी तुला काही सांगायचे आहे असे सांगून तिचा व्हाट्सअप क्रमांक इंस्टाग्राम आयडी व पासवर्ड घेतला. यातून सलगी निर्माण करत महिलेला धमकी दिली.
महिलेने तो नंबर ब्लॉक केला तर तो इतर नंबर वरून फोन करून शिवीगाळ करू लागला. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.