पुरंदर
पुरंदर तालुक्यातील वनपुरी याठिकाणी गावठी दारु पकडली असता गुन्हा दाखल करताना हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
हकीगत –
दि.28/10/2021 रोजी सकाळी 10:00 वा.चे.सुमारास सासवड पोलीस स्टेशन येथे इसम सिताराम मारूती कुंभारकर रा.वनपुरी ता.पुरंदर जि.पुणे यांचे विरूध्द दारूबंदी कायदयानुसार गुन्हा दाखल करीत असतांना त्याचा मुलगा अमोल सिताराम कुंभारकर रा.वनपुरी ता.पुरंदर जि.पुणे हा पोलीस स्टेशनला येवुन माझे वडीलांचे विरूध्द गुन्हा दाखल करता का,असे म्हणुन अरेरावीची भाषा वापरून तुला सस्पेंन्ड करायला लावतो, तुम्हा पोलीसांना खुप माज आला आहे. असे म्हणुन पोलीस नाईक सय्यद याचे वर्दीची कॉलर पकडुन ”तु मध्ये बोलु नको मी तुम्हा सर्वाना घोडा लावनार आहे.” असे म्हणुन पोलीस ठाणेत आरडा ओरडा केला व सरकारी कामात अडथळा आणला. मला माझे शासकिय कर्तव्य पार पाडण्यास प्रतिबंध केला.म्हणुन त्याचे विरूध्द भा.द.वि.कलम 353,506 प्रमाणे कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे.
लियाकतअली मुजावर यांनी फिर्याद दिली असुन पुढील तपास पोलिस निरीक्षक घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली लडकत करीत आहेत.