……..तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल ?????

……..तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल ?????

मुंबई

शिवसेना नेमकी कुणाची? धनुष्यबाण कुणाला मिळणार? 16 आमदार पात्र की अपात्र? अशा याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. घटनापीठासमोर सुरू असलेल्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. अशातच या सत्तासंघर्षावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत मांडलं आहे.

पक्षांत्तरबंदी कायद्याखाली जर 16 आमदारांचं निलंबन झालं तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट लागू होईल असं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे16 आमदारांच्या निलंबनाबाबत घटनातज्ज्ञ उल्हास बापट म्हणाले, ‘एखाद्या पक्षातील दोन तृतीअंशी आमदार जर बाहेर पडले तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करता येत नाही. इथं मुद्दा असा आहे की हे दोन तृतीअंशी आमदार एकाचवेळी बाहेर पडले नाही. सुरूवातीला 16 आमदार बाहेर पडले.

त्यानंतर एक-एक करत इतर आमदार बाहेर पडले’, हा घोडेबाजार लोकशाहीसाठी खूप घातक आहे असं बापट यांनी म्हटलं आहे.पहिले 16 आमदार जे पक्षाबाहेर गेले, ते दोन तृतीअंश आमदार नव्हते. त्यामुळे त्यांचं निलंबन झालं पाहिजे असं माझं व्यक्तीगत मत आहे. पुन्हा 2003 साली जी घटनादुरूस्ती केली. त्यानुसार पक्षांत्तरबंदी कायद्याखाली जर निलंबन झालं, तर त्याठिकाणी मंत्री राहता येत नाही. इतर ठिकाणी जर निलंबन झालं तर मंत्री राहता येतं.

6 महिन्यांच्या आत निवडणून आलं तर चालतं’. असं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.पक्षांत्तर बंदी कायद्याखाली जर 16 आमदारांचं निलंबन झालं तर ते मंत्री राहणार नाही. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीच राहिले नाही तर हे सरकार पडतं. म्हणजेच काय तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *