पुणे
पुण्यात सेक्सटॉर्शनमुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. अमोल गायिकेड असे या तरुणाचे नाव आहे. अमोल धनकवडीत रहायला होता. अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर उपलोड करायची धमकी देत एक तरुणी त्याला सातत्याने ब्लॅकमेल करत होत.
अमोलने या तरुणीला साडेचार हजार दिले होते मात्र तरी देखील ही तरुणी अमोलला धमकी देत होती. यावर अमोलने तिला संदेश पाठविला की, ‘मैं सुसाईड करा रहा हूँ’. त्यावर तिने ‘करो सुसाईड, मैं सोशल मीडियापर व्हीडीओ व्हायरल कर रही हूँ’, अशी धमकी देऊन पैशांची मागणी केली. अखेर अमोलने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ३० सप्टेंबर रोजी घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र ही तरुणी अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाची काही महिन्यांपूर्वी सोशल नेटवर्किंग साइटवर या तरुणीशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमधील संवाद वाढला आणि त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास नग्नावस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
तरुणाने तिला ऑनलाइन पद्धतीने साडेचार हजार रुपये पाठविले होते. मात्र त्यानंतर देखील ही तरुणीने त्याला धमकावत होते. दरम्यान, या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.