जेजुरी पोलिसांची धडक कारवाई : ५००० लिटर गावठी हातभट्टी बनविण्याचे कच्चे रसायन केले नष्ट

जेजुरी पोलिसांची धडक कारवाई : ५००० लिटर गावठी हातभट्टी बनविण्याचे कच्चे रसायन केले नष्ट

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्वेस असणार्या राजेवाडी येथील गावठी दारु (हातभट्टी) बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भट्टी जेजुरी पोलिसांनी धडक कारवाई करुन फोडली आहे.

ओंकार उर्फ ओमश्या शिवा राठोड असे गावठी दारु बनविणाराचे नाव असुन ५००० लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे सुमारे सोळा हजार रुपये किमतीचे कच्चे रसायन जेजुरी पोलिसांनी धडक कारवाईत नष्ट केले आहे.

जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनिल महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोनवलकर,पोलिस हवालदार मुतनवार,पोलिस नाईक यादव,स्वामी,महिला पोलिस नाईक पवार,पोलिस कॉंन्स्टेबल शेंडे तसेच पोलिस निरीक्षक प्रविण शेलार,पीएसआय राजेंद्र झोल,एएसआय संदिप लोहकरे,पोलिस कॉंन्स्टेबल यांनी ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *