जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठी घोषणा;मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठी घोषणा;मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय

पुणे

राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली आहे. आजच्या बैठकीत शाळांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांव्यतिरिक्त आरोग्य, अन्न आणि नागरी पुरवठा, जलसंपदा विभागाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय झाले यावर एक नजर टाकूया.

राज्यात पीएम श्री योजना राबवून शाळांचे सक्षमीकरण करणार. पहिल्या टप्प्यात ८१६ शाळा विकसित करणार

धान शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी १५ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे.यासाठी १ हजार कोटी निधीस मान्यता देण्यात आली आहे. ५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र आणि महाराष्ट्र सीओईपी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीमध्ये सुधारणा. अध्यादेश काढणार.

महाराष्ट्र वैद्यकीय खरेदी प्राधिकरण अधिनियमास मान्यता दिली आहे. औषधी, वैद्यकीय उपकरणे खरेदी आता मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीमार्फत होणार.

पैनगंगा नदीवरील ११ बॅरेजेसच्या कामांना गती देणार. सुमारे ७८७ कोटी खर्चास मान्यता दिली आहे. यामुळे ७६९० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ, जेजुरी तीर्थक्षेत्र तसेच सेवाग्राम विकास आराखड्यांचे सादरीकरण . छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळासाठी ३९७ कोटी ५४ लाख खर्चाचा विकास आराखडा. जेजुरीसाठी १२७ कोटी २७ लाखाचा विकास आराखडा.सेवाग्राम विकासासाठी १६२ कोटींचा विकास आराखडा आदि निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *