जेजुरी
ऊद्या असणार्या सोमवती यात्रेनिमित्त सर्व दुकानदारांनी व व्यावसायीकांनी गर्दी रोखणेकामी सहकार्य करावे असे आवाहन जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुनिल महाडिक यांनी केले आहे.
आजपासुन जेजुरीत कलम १४४ लागु केले असुन जेजुरीत फक्त अत्यावश्यक सेवा चालु ठेवण्यात येणार आहेत.
अत्यावश्यक सेवा सोडुन सर्व दुकाने ही व्यावसायीकांनी बंद करावीत ज़र गर्दी झाली तर आपण कोरोणाला पसरवण्यात कारणीभुत ठरु त्यामुळे प्रत्येक व्यावसायिकाने सहकार्य करावे असे आवाहन जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुनिल महाडिक यांनी केले आहे.