जिल्हा परिषद शाळेतील खळबळजनक प्रकार!पोषण आहाराच्या तांदळात दगडी खडी

जिल्हा परिषद शाळेतील खळबळजनक प्रकार!पोषण आहाराच्या तांदळात दगडी खडी

पुणे

नवापूर तालुक्यातील ढोंग जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये दगडी खडी आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सरकार विद्यार्थ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पोषण आहार योजना राबवत असते. मात्र ठेकेदारांकडून अशा भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याच्या दिसून येत आहे. त्यामुळे शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली गेली पाहिजे, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे. 

एवढ्या मोठ्या प्रमाणावर पोषण आहारामध्ये दगडी खडी आढळून येत आहे. यामुळे पुरवठा होत असलेल्या पोषण आहार देखील कमी प्रमाणावर शाळेत मिळत आहे. हा प्रकार नवापूर तालुक्यातील ढोंग जिल्हा परिषदेच्या शाळेत आढळून आला आहे.

मात्र असे अनेक शाळांमध्ये देखील असेच प्रकार होत आहे का काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी देखील मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *