“जिजाऊ ब्रिगेडचा” दणका !!!!              पुणे जिल्हा शिक्षणाधिकार्यांनी व्यक्त केली दिलगिरी ; तात्काळ केले स्पर्धेच्या विषयांमध्ये बदल

“जिजाऊ ब्रिगेडचा” दणका !!!! पुणे जिल्हा शिक्षणाधिकार्यांनी व्यक्त केली दिलगिरी ; तात्काळ केले स्पर्धेच्या विषयांमध्ये बदल

पुणे

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळांसाठी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत वक्तृत्व निबंध भजन गायन अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत त्या स्पर्धांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जे परिपत्रक काढले आहे व विद्यार्थ्यांना सादरीकरणासाठी जे विषय दिलेले आहेत त्या विषयांमध्ये कोणताही अभ्यासपूर्णता नसल्याचे व हे विषय द्वेषपूर्ण भावनेतून निवडले गेल्याचे पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचा निदर्शनास आणले.

या विषयांमध्ये प्राथमिक मधील चिमुकल्या मुलांना भजन गायनासाठी ‘झाला महार पंढरीनाथा’ असा थेट जातीय उल्लेख असणारा अभंग जिल्हा परिषदे कडून परिपत्रकात देण्यात आला होता.

पुणे जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये जे विषय दिलेले आहेत, त्यामध्ये भजन गायनासाठी ‘झाला महार पंढरीनाथा’ असा वादग्रस्त व थेट जातीय उल्लेख असणारा अभंग दिला आहे.
तसेच वक्तृत्व स्पर्धेसाठी जे विषय दिलेले आहेत, त्यामध्ये महिला समाज समाजसुधारकामध्ये जिजाऊ, क्रांतिज्योती सावत्रीबाई फुले, यांना टाळून फक्त झाशीच्या राणी बद्दल विषय दिला आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी व जिजाऊ रणरागिणीन्नी पुणे जिल्हा परिषदेत जाऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांची भेट घेतली व त्यांना निषेधाचे निवेदन दिले.

खरंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांच्या बालमनामध्ये समता रुजवायची आहे का? महार समाजाने ‘महार’ ही ओळख सोडून बौद्ध ही ओळख धारण केलेली असताना पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मनात जिल्हा परिषदेला ‘महार’ शब्द का रुजवायचा आहे? असा सवाल संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडने उपस्थित केला.

तसेच ज्या सावित्रीमाता फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दगड, शेण, धोंडे चिखल माती यांचा मारा सहन केला व याच पुणे शहरांमध्ये देशातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या पुणे जिल्हा परिषदेच्याच विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या स्पर्धेमध्ये वक्तृत्वाचा व निबंधाचा विषय होऊ शकत नाहीत.. ही खूप मोठी शोकांतिका आहे.तसेच राष्ट्रमाता स्वराज्य संकल्पक जिजाऊंनी याच पुण्यामध्ये शिवरायांना स्वराज्य घडवण्याचे धडे दिले,जिजाऊंचा तो आदर्श आजच्या पुणे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्वाचा निबंधाचा विषय होऊ शकत नाही हे ही दुर्दैवच म्हणावे लागेल.खरंतर जिल्हा परिषदेला जिजाऊ, सावित्रीबाई,मुक्ता साळवे,आहील्याबाई होळकर, माता रमाई,फातिमा शेख या जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना कळू द्यायच्या नाहीत,विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास करून द्यायचा नाही? हे एक षड्यंत्र आहे का? असा सवाल संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडने उपस्थित केला.

हा प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर दिलगिरी व्यक्त करत पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सौ संध्या गायकवाड यांनी सदर परिपत्रक मागे घेत स्पर्धांचे विषय बदलण्याची घोषणा केली व त्यानंतर नवीन परिपत्रक जारी केले व त्यामध्ये सर्व महामाता यांचा समावेश केला. तसेच वादग्रस्त विषय वगळून त्यांनी स्पर्धा घेतल्या जातील असे सांगितले व दिलगिरी पत्र लिहून दिले.

यावेळी पुणे जिल्हा परिषद येथे मुख्यशिक्षणाधिकारी यांच्या दालनात संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेडचा दौंड तालुका अध्यक्ष शिवमती सारिकाताई भुजबळ,पुणे महानगर अध्यक्ष स्मिता म्हसकर,गीता गाढवे,शोभा जगताप,प्रियंका पाटील तसेच धडाडीचे संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक संतोष शिंदे,जिल्हाध्यक्ष चंद्रशेखरगाडगे,जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे,जिल्हा संघटक भरत भुजबळ,शाम पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *