पुणे
माणसात जिद्द असली तर काय करू शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मावळातील परांदवाडीच्या सरपंच सुलभा भोते. आपल्या गावचा विकास करण्यासाठी त्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्या आणि विक्रमी मतांनी निवडून आल्या. एकच ध्यास गावचा विकास. हा ध्यास मनी धरून मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मागे तगादा लावला आणि गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवला.
सुलभाताईंनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत तीन कोटी 83 लाख रुपये निधी आणला. महिला कुठेही कमी नाही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ते काम करत शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.
या विकासकामाचे गावाने काैतुक केले. या पाण्याच्या टाकीच भूमिपूजन करण्याकरिता शेतकरी महिलांसोबत कुलस्वामी महिला मंचचा अध्यक्ष सारिका शेळके यांच्या हस्ते आणि सुसज्य अशा नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला माेठ्या संख्येने महिल उपस्थित हाेत्या. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी ही म्हण तंतोतंत सुलभा भोते यांनी खरी करून दाखवली अशी भावना ग्रामस्थांची हाेती.