छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ग्रामपंचायत आवारात बसविण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाच्या वतीने निवेदन

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा ग्रामपंचायत आवारात बसविण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी कॉंगेस पक्षाच्या वतीने निवेदन

पुरंदर

पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील आंबळे ग्रामपंचायतच्या आवारात छत्रपतींचा पुतळा उभारण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने ग्रामपंचायत आंबळे यांना निवेदन देण्यात आले.

आंबळे गावास खुप मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे असे असताना गावामध्ये कोणत्याही महापुरुषाचा पुतळा नाही ही खुप खेदजनक बाब असल्याकारणाने महापुरुषांचे विचार तरुण पिढीच्या मनात रुजविण्यासाठी पुतळा उभारण्यासाठीचे निवेदन आंबळे ग्रामपंचायतचे उपसरपंच सचीन दरेकर व ग्रामसेवक गोरोबा वडवले यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी आंबळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच मंगेश गायकवाड,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पुरंदरचे सरचीटणीस सुमित जगताप,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आंबळे अध्यक्ष वैभव दरेकर,माजी उपसरपंच नामदेव थोरात,ग्रा.पं.सदस्य अजित जगताप,नितीन ढोले,प्रमोद दरेकर आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *