मुंबई
राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख आहे. यात काहीच सुख नाही. पण कधीतरी राजभवनावर चांगली लोक इथं आली की, मला आनंद होतो, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. कोश्यारी यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यातील विविध पवित्र जैन तिर्थक्षेत्रांच्या सुरक्षा व सुविधांसाठी पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटचे लोकार्पण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुमुक्षरत्न सेतुकभाई अनिलभाई शाह यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानन्दगिरिजी (ट्रस्टी वैष्णोदेवी मंदिर) आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांची विशेष उपस्थिती होती.
भगतसिंह कोश्यारी या कार्यक्रमात म्हणाले, ‘मंगलप्रभात लोढा यांना कुठे किती खर्च करायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे ते येथे कमी बोलतात. अन्य अनेक पंथ असे आहे, त्याचा प्रोफेट होतो, त्यांचा एकच ग्रंथ आणि त्यालाच मानावे लागते. मात्र, आपल्याकडे अवतार आहेत. अनेक पंथ आहेत. एक धर्म आहे. जे दोघे भांडतात. मग त्यात दोन संप्रदाय होतात. त्यात पण भांडतात. आपल्याकडे जैन धर्माचा गुरुद्वारात जातो.
गुरुद्वारावाला मंदिरातही जातो’.’छत्रपती शिवाजी महाराज व्हावे, भगतसिंह, चंद्रशेखर, लोकमान्य टिळक व्हावे अशी सर्वांची इच्छा असते, मात्र आपल्या नाही तर दुसऱ्यांकडे व्हायला हवे अशी भावना असते, असे कोश्यारी पुढे म्हणाले.’राज्यपाल होणं म्हणजे दु:खच दु:ख आहे. यात काहीच सुख नाही. मात्र, राजभवनावर अशी लोक येतात, तेव्हा चांगलं वाटतं. मी आता ८० वर्षांचा झालो आहे. त्यामुळे मी आता काही मुमुक्षरत्न बनू शकत नाही. अशा लोकांजवळ येतो, तेव्हा त्यांचा सुगंध देखील लागतो, असेही पुढे राज्यपाल म्हणाले.’जैनतीर्थ सर्किट बनवलं आहे. सरकारला आवाहन आहे की, पर्यटन मंत्रालयसोबतच तीर्थ मंत्रालय देखील व्हावं. सर्वच मुमुक्ष, मुनी, राज्यपाल बनू शकत नाही, असे मत राज्यपाल कोश्यारी मांडले.