अमरावती
महाराष्टातील सर्व सरपंच संघटनांनी ग्रामविकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन पद्मश्री .पोपटराव पवार यांनी केले आहे.आज ते हिवरे बाजार निवासस्थानी येथे सरपंच सेवा महासंघाच्या पदाधिकार्या सोबत संवाद साधत होते.
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959 नुसार सर्व ग्रामपंचायती सक्षम होण्यासाठी व सरपंचांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट मध्ये अनेक सरपंच संघटना कार्यरत आहेत .
या सर्व संघटना आप आपल्या पातळीवर आपल्या संघटनेच्या माध्यमातुन सरपंचांचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहेत. मात्र या संघटना आपल्या पातळीवर काम करताना शासन दरबारी आपल्या संघटनेच्या माध्यमातुन निवेदन देत असतात. परंतु अनेक संघटना असल्यामुळे या सरपंच संघटनांचा प्रभाव एकत्रितपणे दिसुन येत नाही .त्यामुळे या सर्व संघटनांनी एकत्रित येऊन सरपंचांच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम घोगरे यांनी पुढाकार घेऊन आज पद्मश्री पोपटराव पवार यांच्याशी चर्चा केली व सर्व संघटनांनी एकत्रित येऊन चर्चा व विचार विनिमय करण्याचे आवाहन करण्याची विनंती पद्मश्री पोपटराव पवार यांना करण्यात आली.
सर्व सरपंच संघटनांनी एकत्रित येऊन चर्चा व विचार विनिमय करावा .आवश्यकता भासल्यास आपण सर्व जण विचार विनिमयांसाठी एकत्रित बसु असे ही आवाहन पद्मश्री पोपटराव पवारांनी सर्व सरपंच संघटनेच्या पदधिकार्यांना केले आहे.
तत्पूर्वी पद्मश्री आदर्श सरपंच पोपटराव पवार यांनी सरपंच सेवा महासंघाचे संस्थापक राज्याअध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांचा फेटा बांधून सत्कार केला, सरपंच सेवा महासंघ संपुर्ण राज्यभर सरपंच हितासाठी चांगले काम करीत आहेत या करीता पुढील वाटचालीसाठी सरपंच सेवा महासंघाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच सेवा महासंघाचे राजाध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे , राज्य संपर्क प्रमुख राहुल उके , राज्य मार्गदर्शक शशिकांत मंगळे , सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर,राज्य प्रवक्ते दिनेश गाडगे , राज्य कार्यकारणी सदस्य भाऊसाहेब गिराम, रामनाथ बोर्हाडे , राजेंद्र कांहाडळ , अहमनगर जिल्हाध्यक्ष अनिलराव शेंडाळे , ग्रामीण राजकीय अभ्यासक शरद दारकुंडे सर ,सामाजिक कार्यकर्ते कैलास जाधव व आदी पदधिकारी उपस्थित होते.
खरचं गरजेचे आहे एकत्र येऊन काम करने .