ग्रामपंचायतींच्या प्रश्नांसंदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पदाधिकार्‍यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक संपन्न.

ग्रामपंचायतींच्या प्रश्नांसंदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पदाधिकार्‍यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक संपन्न.

मुंबई

राज्यातील सरपंच व ग्रामपंचायतींच्या विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजित पवार यांची अखिल भारतीय सरपंच परिषदेने अनेक वेळा वेळ मागीतली होती कारण उपमुख्यमंत्री व वीत्त आणि नियोजन मंत्री असणाऱ्या अजितदादानी ठरवल्यास अनेक महत्वाचे निर्णय होऊ शकतात त्यामुळे अनेक दिवसांच्या पाठपुराव्यामुळे आज आमच्या पदाधिकार्‍यांसोबत गुरुवारी मुंबई मंत्रालय येथे अर्धा तास बैठक संपन्न झाली.यावेळी परिषदेच्यावतीेने ग्रा.पं.ना येणार्‍या अडचणी व विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली व निवदेन देण्यात आले.या बैठकीवेळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत सर्जेराव पाटील, कार्यकारी अध्यक्ष मंत्रालय विभाग नितीनराजे जाधव, राज्य उपाध्यक्ष शशिकांत मोरे, मुंबई विभाग प्रमुख अनिल ढवळे, ठाणे जिल्हा प्रमुख अनिल भोईर, अभिजित चव्हाणकोल्हापूर यांचेसह राज्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सध्या राज्यातील ग्रामपंचायती कोरोना महामारीमुळे व उत्पन्नाचे स्त्रोत कमी असल्याने ग्रामपंचायती अडचणीतून जात असल्याने राज्य शासनाने यावर तोडगा काढावा यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्यावतीने ग्रामपंचायतींचे उत्पन्नवाढ व वसूल यासंदर्भात शासनाने स्वतंत्र बैठक घ्यावी, सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी व ते नियमितपणे मिळावे, मुंबईत सरपंच भवन उभारण्यात यावे ,ग्रामपंचायतीचे काम करण्यासाठी मंत्रालयातून कंपनी नेमू नयेत कारण त्याचा खर्च ग्रा.पं.ना परवडत नाही, ग्रामपंचायतीचे वीजबील कमर्शियल ऐवजी अश्वशक्तीने आकारावे तसेच त्यामध्ये विविध अधिभार व व्याज दंड आकारण्यात येऊ नयेत, वित्त आयोगाचा निधी राखीव कामासाठीच राखीव असावा, सरपंचावरील अविश्वास ठरवासाठी ग्रामसभा बंधनकारक करावी तसेच राज्यातील सरकार स्थापन झाल्यापासून कोरोनामुळे ग्रामपंचायत संदर्भात एकही मिटींग होऊ शकली नसल्याने ती घेण्यात यावी,आदी मागण्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आल्या.

याबाबत त्यांनी सरपंच परिषदेच्या पदाधिकार्‍यांशी अत्यंत काळजीपूर्वक चर्चा केली व या चर्चेमध्ये ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना दूरध्वनीवरुन सहभागी करून घेतले तसेच सरपंच व ग्रामपंचायतीच्या प्रश्नासंदर्भात गणपती उत्सवानंतर तातडीची बैठक घेण्याबाबत सूचना केल्या.

अनेक प्रश्न समजून घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर मंत्रालयीन आयोजित बैठकीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषद पदाधिकारी यांना निमंत्रित करण्यात येईल असे सांगितले.
या बैठकीमुळे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले व उपमुख्यमंत्री अजितदादाचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *