चंद्रपुर
दारू दुकानं बंद करा या मागणीसाठी महिला रस्त्यावर उतरताना तुम्ही-आम्ही पाहिलं. मात्र गावात दारू दुकान सुरू करा, यासाठी महिला ग्रामपंचायत कार्यालयावर धडकल्या.
गावात अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यापेक्षा परवानाप्राप्त दारू दुकान सुरू करा. किमान त्यामुळे आम्हाला रोजगार मिळेल, अशी मागणी महिलांनी केली आहे.
महिलांच्या या मोर्चाला तोंड न देता सरपंच, सचिवांनी ग्रामपंचायतीला दांडी मारली. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातल्या गट ग्रामपंचायत देवाडा इथं घडला.