सांगली
भ्रष्टाचाराने आपल्या देशाला अक्षरश: पोखरून काढलं आहे. ऑफिस मोठं असो की छोटं, प्रत्येक ठिकाणी लाच मागितली जाते. छोट्या छोट्या गोष्टींसाठीही लोकांची अडवणूक केली जाते. त्यामुळे लोक अक्षरश: वैतागून गेले आहेत.
अनेकदा तर लोकांच्या संतापाचा कडेलोट होत असतो. सांगलीतील कडेगाव येथेही असाच एका कर्मचाऱ्याच्या संतापाचा कडेलोट झालेला पाह्यला मिळाला.कडेगाव येथे आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्याने एका व्यक्तिला लाच मागितली. या व्यक्तीकडे खायला पैसे नव्हते. तो लाच कुठली देणार? मग त्याने चक्क अंगावरची कपडे काढून अधिकाऱ्याला दिले. लाचच्या बदल्यात कपडे घ्या, पण माझं काम करा, असा टाहोच त्याने फोडला. या अजबप्रकारामुळे आरटीओ अधिकाऱ्याच्या तोंडचेच पाणी पळाले असून या प्रकाराची जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात एका व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे आरटीओ कॅम्पमधील. गाडी पासिंगसाठी लाच मागितल्या नंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी चक्क आपले कपडेच काढून अधिकाऱ्याला देत आंदोलन केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.वाहन पासिंग करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. लाच मागितल्या नंतर चक्क आपले कपडे काढून देत कडेगावमधील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मांडवे यांनी हे अनोखे आंदोलन केले.