पुणे
प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात,होय ते खरंच आहे. कारण, प्रेमासाठी कलियुगातील प्रेमीयुगुल काय करतील याचा अंदाज बांधणं कठीण आहे. सध्या व्हॅलेंटाईनचा आठवडा सुरू असून अनेक तरुण प्रेयसीच्या शोधात आहे.पण प्रपोज कुणाला करावं याचाही अंदाज हवा.कारण,प्रेम व्यक्त करणे हा गुन्हा नसला तरी असे करण्याआधी त्याच्या परिणामांचा विचार करायला हवा.सध्या सोशल मीडियावर एका तरुणाच्या प्रपोजची चांगलीच चर्चा सुरू आहे.
या तरुणाने कुठल्याही परिणामाचा विचार न करता भररस्त्यात चक्क एका विवाहित महिलेला प्रपोज केलं. तरुणाचं हे कृत्य बघून महिलाही चांगलीच भडकली. त्यानंतर भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा सुरू झाला.या विवाहित महिलेने भररस्त्यातच प्रपोज करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाची चांगलीच खरडपट्टी केली. मी तुझ्या आईच्या वयाची आहे, असं म्हणत महिलेने तरुणाला चप्पलेने चांगलाच चोप दिला.
Kalesh Over Proposing Aunty 🗿 pic.twitter.com/PRcrwaTCYB
— Gharkekaleshh (@gharkekaleshh) February 7, 2023
भर रस्त्यावर सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा पाहून अनेकांची गर्दी जमा झाली. गर्दीतील एका वयोवृद्ध व्यक्तीने देखील या तरुणावर हात साफ करून घेतला.