नीरा
शिक्षक असल्याची बतावणी करत निरा (ता. पुरंदर) येथील दिव्यांग महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत एकाने तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची घृणास्पद घटना उघडकिस आली. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्य़ादीवरून जेजुरी पोलिस ठाण्यात युवराज नरहरी दणाणे (वय 44, रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या घटनेत दिव्यांग महिलेचे शारिरिक शोषण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी युवराज नरहरी दनाने याने निरेतील दिव्यांग महिलेस मी शिक्षक असून मला 1 लाख रुपये पगार असल्याची खोटी माहिती सांगून व लग्नाचे आमिष दाखवून त्या महिलेवर वेळो वेळी आत्यचार केले. तो नोकरीस नसल्याची माहिती महिलेच्या लक्षात आल्यावर या महिलेने जेजुरी पोलीस स्टेशनला 7 सप्टेंबर रोजी सदर आरोपी बद्दल 376 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी पकडणे कामी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा चौकीचे सहायक फौजदार सुदर्शन होळकर, राजेंद्र भापकर, निलेश जाधव, हरिश्चंद्र करे , पोलीस पाटील राजेंद्र भास्कर यांनी या आरोपीस एका तासात लोणंद रेल्वे टेशन ला पकडले. याचा पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पी एम गावडे हे करीत आहेत.