खासदारांनी स्वीकारले पालकत्व

खासदारांनी स्वीकारले पालकत्व

पुरंदर

जेजुरी येथील सुरज व दुर्गा घोणे या दांपत्याचे कोरोनामुळे निधन झाले.आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या त्यांच्या दोन्हीमुलांचे (वय वर्षे ४ व दीड) पालकत्व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी स्वीकारले आहे. त्यानंतर त्यांनी घोणे परिवाराच्या घरी जाऊन त्या मुलांचे आजी आजोबा लक्ष्मी घोणे व विलास घोणे यांची भेट घेऊन परीवाराचे सांत्वन केले.

या मुलींना शिक्षण, आरोग्य अशा सर्व आवश्यक सुविधा पुरविल्या जातील असे खासदारांनी सांगीतले. याप्रसंगी माजीआमदार अशोकभाऊ टेकवडे, ज्येष्ठ नेते दिलिप दादा बारभाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडेआदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *